Airstrike : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया
भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत.
मुंबई : मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय वायूदलाने पकिस्तानी दहशत स्थळांवर ही कारवाई केली आहे. भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने भारतीय वायुदलाचे आभार व्यक्त केले आहे. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केले आहे. '...अंदर घुस के मारो' म्हणत त्याने भारतीय वायुदलाचे कौतुक केले आहे.
त्याचप्रमाणे माजी क्रिके़टर आणि नेता नवज्योत सिंग सिद्धूंनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या शायराना अंदाजात भारतीय वायुदलाचे कौतुक केले आहे.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने २०० ते ३०० दहशदवाद्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्याची अधिकृत घोषणा परदेश सचिव विजय गोखले यांनी केली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर वायुदलाने १००० किलोची स्फोटकांसहीत हल्ला केला. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारतीय वायूदलाच्या १२ 'मिरज २०००' या लढाऊ विमानांनी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळं उद्ध्वस्त केली.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.