मुंबई :  दुबईत एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ऐश्वर्या राय बच्चनभोवती चाहत्यांचा भलामोठा गराडा पडला. मात्र या गर्दीत बच्चन बहू अन्कंफर्टेबल दिसली. काय होतं यामागचं कारण पाहूया.


ऐश्वर्याची जादू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निली-निली आँखोवाली ऐश्वर्या राय बच्चन एक ग्लॅमरस अॅक्ट्ररेस आहेच आहे. पण ऐश्वर्या हिप्नोटाईज करण्यातही माहीर आहे. ऐश्वर्याची जादूच अशी काही आहे की आजही तिच्यावर अक्षरशा फिदा असणारे लाखो-करोडो फॅन्स आहेत.


चोहोबाजूने गराडा


दुबईत एका प्रॉडक्टच्या ब्रॅण्ड प्रमोशनसाठी पोहोचलेल्या ऐश्वर्याने जणू सगळ्यांनाच हिप्नोटाईज केलंय की, काय असा माहौल दिसला. ऐश्वर्यावर असे सगळेच फॅन्स फिदा असताना, तिला फॅन्सनी चोहोबाजूने गराडा घातला असताना, खुद्द ऐश्वर्या मात्र काहीशी अन्कंफर्टेबल वाटत होती.ऐश्वर्याच्या या अस्वस्थतेचं कारण मिळालं ते ती दुबईहून मुंबईत पोहोचल्यावर. 


ऐश नाराज आहे


सरोगेसी प्रेग्नसीवर आधारित असलेल्या जासमिन फिल्ममध्ये आपल्या नावाचा गैरवापर केल्याने ऐश नाराज आहे. या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे ऐश्वर्या नाराज आहे. 


ऐश्वर्या दिसणार नव्या भूमिकेत


या फिल्मच्या निर्मात्यांशी बोलून तिने याबाबत नाराजीही व्यक्त केलीये. ज्या फिल्मशी आपला काही संबंध नाही, त्यामध्ये आपलं नाव कोणीतरी जाणूनबुजून वापरत असल्याचं ही बच्चन बहू म्हणतेय. मात्र हे सांगतानाच आपण यापेक्षा एक वेगळी फिल्म घेऊन येत असल्याचं तिने म्हटलंय. ज्यात ऐश्वर्या एका सिंगरच्या भूमिकेत दिसणारे.