मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने अनेक अभिनेत्रींना या फिल्म इंडस्ट्रीत स्थान मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्यापैकी ऐश्वर्या रायचं नावही याच यादीत येतं. एक काळ असा होता जेव्हा या जोडप्यांचा रोमान्स चित्रपटांमध्ये दिसण्यापेक्षा वास्तविक आयुष्यात खूप जास्त होता. वास्तविक जीवनातही ते एकमेकांना पसंत करायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर दोघांचं नातं एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे तुटलं. पण त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, ऐश्वर्याचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने सलमान खानबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये ऐश्वर्या तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. जेव्हा सिमी ग्रेवालने तिला बॉलिवूडच्या सेक्सी आणि गोर्जियस पुरुषाबद्दल विचारलं तेव्हा ऐश्वर्याने आधी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यानंतर अभिनेत्री म्हणाली, हा खूप कठीण प्रश्न आहे. ती पुढे विचारते, 'मी हा शब्द चार्मिंगमध्ये बदलू शकते का?'


यावर सिमी ग्रेवालने फक्त सेक्सी आणि देखण्या अभिनेत्याचं नाव सांगण्याचा आग्रह धरला. त्यादरम्यान ऐश्वर्या खूप संकोचतेने म्हणते की, 'भारतीय माणसाच्या यादीत नुकतंच आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या अभिनेत्याचं नाव मला घ्यायला आवडेल. आणि  तो म्हणजे सलमान खान.' यानंतर सिमी ग्रेवाल सलमान खानबद्दल म्हणते, 'त्याचे फीचर्स खूप चांगले आहेत. तोही खूप छान दिसतो.


चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट झाली
ऐश्वर्या आणि सलमानच्या नात्याची सुरुवात संजय लीला भन्साळी यांच्या 1999 मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती हे सर्वांनाच माहीत आहे. यानंतर 2001 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. हा व्हिडीओही त्याचवेळचा आहे.