Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या करिअर पेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिषेक बच्चनसोबत असलेले तिचे मतभेद आणि त्याशिवाय त्यांच्या घरात सुरु असलेल्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. काही रिपोर्ट्समध्ये तर हा दावा देखील करण्यात आला आहे की ऐश्वर्या आणि अभिषेक गे विभक्त झाले आहेत आणि आता ते ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एकदा तर ऐश्वर्यानं तिला झालेल्या त्रासाविषयी चर्चा केली होती. इतकंच नाही तर ती कधीच दुसऱ्यांच्या लेव्हलवर जाणार नाही असं देखील तिनं म्हटलं होतं. हे सगळं तिनं तिच्या स्लॅम बूक अर्थात डायरीमध्ये लिहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या रायनं अभिषेक बच्चनसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर ते एप्रिल 2017 मध्ये लग्न बंधनात अडकले. अभिषेकशी लग्न करण्याआधी ऐश्वर्या ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. त्याच्याशी ब्रेकअप केल्यानंतर ती विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्याचा खूप घाणेरडा ब्रेकअप झाला होता. त्यानं मारहान केल्याचे आरोप ऐश्वर्यानं केले होते. त्यानंतर विवेक ओबेरॉयनं प्रेस कॉन्फरन्स घेत सलमानवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर हे सगळं प्रकरण चर्चेत आलं आणि त्यानंतर ऐश्वर्या ही स्वत: ला सगळ्या प्रकारच्या वादापासून स्वत: ला दूर केलं होतं. 


ऐश्वर्याच्या डायरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेत आला आहे. ज्यामुळे तिचं खासगी आयुष्य आणि तिच्या आवडी-निवडींविषयी अनेक गोष्टी समोर समोर आल्या आहेत. ऐश्वर्या रायनं म्हटलं की ती वाईट वृत्ती असलेल्या लोकांपासून नेहमीच लांब राहते आणि त्यांच्या लेव्हलवर ती जाऊ शकत नाही. त्याशिवाय तिनं त्यात म्हटलं की अशा लोकांना पाहून तिला आश्चर्य होतं जे तिच्याविषयी काहीही चर्चा करतात तिच्यावर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाही आणि आनंदी होतात. ऐश्वर्यानं डायरीमध्ये हे देखील सांगितलं की तिला लोकांसमोर कोणालाही काहीही बोलायला आवडत नाही. 


हेही वाचा : 'डंके की चोट पे...' गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस' हिंदीत झळकणार!


ऐश्वर्यानं त्यात म्हटलं होतं की तिला तिची दु:खं ही लोकांसमोर मांडायला आवडक नाही तिच्यापर्यंतच ठेवायला आवडतात आणि त्यावरच तिचा विश्वास देखील आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणीच त्या दोघांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिषेक आणि ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चां सुरु असताना ते दोघं अंबानींच्या लग्नात वेगळे दिसले होते. एकीकडे अभिषेकनं बच्चन कुटुंबासोबत एन्ट्री घेतली होती तर दुसरीकडे ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत पोहोचली होती.