संजय लीला भन्साळी यांचं नाव घेतलं की, 'देवदास', 'पद्मावत', 'गंगुबाई काठियावाडी', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' आणि 'हम दिल दे चुके सनम' डोळासमोर येतात. 'हम दिल दे चुके सनम' मध्ये समीरच्या भूमिकेत सलमान खान आणि सलमानची नंदिनी होती ऐश्वर्या राय बच्चन. या चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटादरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमानमध्ये जवळीक वाढली होती, असं मीडिया रिपोर्टनुसार म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भन्साळी यांना नंदिनी या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला पसंती होती. पण आज तब्बल 28 वर्षांनंतर भन्साळी यांनी त्यांच्या आवडत्या नंदिनीसोबत कॅमबॅक केलंय. खुद्द अभिनेत्रीने सांगितलं की, नंदिनीसाठी तिला भन्साळी यांनी ऑफर दिली होती. मात्र तिने ती नाकारली होती. 


अभिनेत्रीने एका मुलाखतीत या किस्साबद्दल सांगितलं. ही अभिनेत्री आहे मनिषा कोईराला. भन्साळी आणि मनिषा यांनी खामोशीमध्ये काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भन्साळी आणि अभिनेत्रीचं खूप चांगल बाँडिंग झालं होतं, असं तिने सांगितलं. हे बाँडिंग आजही कायम असल्याचं अभिनेत्री म्हणते. 


हेसुद्धा वाचा - PHOTO : 'मला शाहिदच्या कानाखाली द्यावीशी वाटली', कबीर सिंगच्या सेटवर कियारा अडवाणी का संतापली?


तिने पुढे सांगितलं की, हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील नंदिनी या भूमिकेसाठी भन्साळी यांचा फोन आला होता. त्यावेळी  मी नेपाळमध्ये आरामात आयुष्य जगत होती. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यावेळी मी भन्साळींना नकार दिला. एवढंच नाही तर शाहरुखच्या देवदाससाठीही भन्साळी यांनी मलाच संपर्क केला होता, असं अभिनेत्रीने सांगितलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)


आज तब्बल 28  वर्षांनंतर हीरामंडी या वेब सीरिजमुळे संजय लीला भन्साळी आणि मनिषा कोईराला एकत्र काम करत आहे. हीरामंडी ही सीरिज नेटफ्लिक्सवर महाराष्ट्र दिनाच मुहूर्त साधून रिलीज झाली आहे. यात मनिषा कोईयरालासोबत सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, शरमिन सहगल या अभिनेत्री तर फरदीन खान, शेखर सुमन आणि अध्ययन सुमन यांचा अभिनय पाहिला मिळणार आहे.