मुलीसाठी मिस वर्ल्ड ऐश्वर्या बनली आया, जया बच्चन यांचा मोठा खुलासा
बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांच्या कामात व्यस्त असतात.
मुंबई : बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांच्या कामात व्यस्त असतात. हेच कारण आहे की कित्येकदा ते त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी चांगल्या आयाच्या शोधात लाखो रुपये खर्च करतात. करीना कपूरची मुले तैमूर आणि जेहची बेबी सिटर असो, सेलिब्रिटी लाखो रुपयांमध्ये त्यांना पगार देतात. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय या सगळ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिची मुलगी आराध्याच्या संगोपनासाठी तिने नैनी किंवा मोलकरीणांवर अजिबात विश्वास ठेवला नाही.
ऐश्वर्या स्वतः आराध्याची काळजी घेते
ऐश्वर्या राय अनेकदा आपली मुलगी आराध्याचा हात धरताना दिसते. फंक्शन असो किंवा कुठेला इव्हेंट, ऐश्वर्या नेहमीच आराध्याची काळजी घेताना दिसून येते. त्यांच्याभोवती नैनीची कोणतीही फौज दिसत नाही. ऐश्वर्या रायची सासू म्हणजेच अभिनेत्री जया बच्चन यांनी आराध्याच्या संगोपनाबद्दल एका मुलाखतीत अनेक खुलासे केले होते.
जया बच्चन यांनी सांगितले की ऐश्वर्या एक परिपूर्ण सून, पत्नी आणि मुलगी आहे, पण ती सर्वोत्तम आई आहे. तिच्या पालकत्वाच्या कौशल्याची प्रशंसा करताना जया बच्चन म्हणाली की, ती आराध्याची सर्व कामे स्वतः करते कारण तिला वाटते की तिच्या मुलीला तिच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही.
कामापेक्षा आराध्याला दिलं प्राधान्य
आराध्याच्या जन्मापासूनच ऐश्वर्याने आपल्या मुलीला कामापेक्षा प्राधान्य दिले आहे. तिने आपल्या मुलीचं डायपर बदलण्यापासून ते तिला खायला देण्यापर्यंत सर्व जबाबदारी घेतली आहे. जया यांनी अगदी गंमतीशीरपणे म्हटले आहे की तिची नात खूप भाग्यवान आहे. कारण तिचा सांभाळ करणारी व्यक्ती 'मिस वर्ल्ड' आहे. आराध्यासाठी घरात किती आया आहेत हे विचारल्यावर जया यांनी सांगितले की, ऐश्वर्याने आराध्यासाठी फक्त एक आया ठेवली आहे.