ऐश्वर्या माझी आई असल्याचा `या` तरूणाचा दावा...
विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
मुंबई : विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. हे कारण काहीसं आश्चर्यकारक आहे. सध्या तिचं नाव एका वेगळ्याच प्रकरणाशी जोडलं गेलं आहे. त्याचे झालंय असं आंध्रप्रदेशमधील २९ वर्षीय मुलाने ऐश्वर्या राय त्याची आई असल्याचा दावा केला आहे.
कोण आहे हा युवक?
हा युवक विशाखापट्टनम येथे राहत असून त्याचे नाव संगीत कुमार आहे. आयईएफमार्फत १९८८ मध्ये लंडनमध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर पुढील दोन वर्ष ऐश्वर्याचे पालक वृंदा राय आणि कृष्णाराज राय यांनीच त्याचे पालन- पोषण केले. पुढे संगीतचे वडील आदिवेलू रेड्डी यांनी त्याला विशाखापट्टनम येथे आणले. नंतर तो रेड्डी कुटुंबियांसोबतच राहू लागला.
काय आहे त्याचा दावा?
याविषयी संगीत म्हणतो, माझ्या आईने 2007 मध्ये अभिषेकशी लग्न केले. गेले 27 वर्ष मी माझ्या कुटुंबियांपासून दूर राहत आहे. मला आईची फार आठवण येते. आईचा मोबाइल नंबर तरी मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. मला पुन्हा विशाखापट्टणमला जायचं नाहीये.’
मात्र ऐश्वर्याचा मुलगा असल्याचा एकही पुरावा त्याच्याकडे नाही आहे. याबद्दल तो म्हणतो, लहान असताना मला नक्की काय करायला हवे ते कळत नसताना माझ्या नातेवाईकांनी सगळे कागदपत्र नष्ट केले. पण आता मला सगळं स्पष्ट झालं आहे. आईने माझ्यासोबत रहावे ही माझी इच्छा आहे.