Aishwarya Rai Bachchan in New York: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. त्यातही तिचं वैवाहिक आयुष्य हे खूप चर्चेत असतं. रिपोर्ट्सनुसार, तिच्यात आणि सासरच्या लोकांमध्ये काहीही योग्य नाही. त्यांच्यात वाद हे सतत सुरु आहेत. इतकंच नाही तर ते घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जाते. आता या सगळ्यामध्ये किती सत्य आहे, हे त्यांना माहित कारण त्यांनी अजूनही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, सध्या ऐश्वर्या ही न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यामुळे तिच्या या ट्रिपनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. चला तर जाणून घेऊया कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर ऐश्वर्या ही एकटी न्यूयॉर्कला ट्रिपला गेल्याचे म्हटले जाते ती लेक आराध्या आणि नवरा अभिषेकशिवाय या ट्रिपवर गेली. अभिषेकनं जेव्हापासून घटस्फोटाची पोस्ट लाइक केली आहे त्यानंतर पहिल्यांदा ऐश्वर्या ही पब्लिक प्लेसमध्ये दिसली. ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो असून हा न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमधील आहे. ऐश्वर्याचा फोटो तिच्या चाहतीनं शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या आणि तिची ही चाहती एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचं दिसतं. तर तिनं ऐश्वर्यासोबतचा आधीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. 



50 वर्षांच्या ऐश्वर्याचा हा फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. एका नेटकऱ्यानं त्या फोटोवर कमेंट केली की देवी, आशा आहे की ती लवकरच बॉलिवूडच्या इतिहासातील अत्यंत चांगलं कमबॅक करेल. तिला आयुष्यात खूप काही मिळायला हवं. दुसरा नेटकरी म्हणाला, मला देखील हिच इच्छा आहे की आजवर मी जितके कमबॅक पाहिले त्यापैकी ऐश्वर्याचा कमबॅक सगळ्यात मोठा असायला हवा. या वयातही ती देवीसारखी सुंदर दिसते. 


हेही वाचा : 'हिच्यापेक्षा ढिनचॅक पूजा बरी!' जेव्हा गाण्यावरून बेक्कार ट्रोल झाली कियारा, सिद्धार्थनं केलं होतं कौतुक


ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी अनंत आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाला पोहोचली होती. त्यावेळी तिनं बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही, तर तिनं आणि लेक आराध्यानं वेगळी एन्ट्री घेतली होती. त्यामुळे एकीकडे संपूर्ण बच्चन कुटुंब आणि दुसरीकडे ऐश्वर्या राय... त्यामुळेच पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात वाद असल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर सोशल मीडियावर एक इनसाईड फोटो समोर आला होता. त्या फोटोत ऐश्वर्या आणि आराध्या हे अभिषेकसोबत बसल्याचे दिसत होते.