Aishwarya Rai Rejected a Movie Because of Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनं तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांसाठी नकार दिलाय. काही ना काही कारणांमुळे ती अनेक चित्रपट करु शकली नाही. त्यात 'कुछ कुछ होता है', 'मुन्ना भाई MBBS' आणि 'भूल भुलैया' सारख्या चित्रपटांची नावं आहेत. पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्यानं शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटाला देखील नकार दिला होता? महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात तिचा नवरा अभिषेक बच्चन देखील होता तरी सुद्धा तिनं या चित्रपटाला नकार दिला होता. याविषयी ऐश्वर्यानं एका मुलाखतीत खुलासा केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्यानं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की तिला 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटासाठी ऑफर मिळाली होती. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅप्पी न्यू ईयर' या चित्रपटासाठी दिग्दर्शिका फराह खाननं तिची विचारणा केली होती. चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याशिवाय विवान शाह, सोनू सूद आणि बोमन ईरानी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


ऐश्वर्यानं सांगितलं की 'हो मला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती आणि त्यात जर मी काम केलं असतं तर ते एका मजेशीर ट्रिपसारखं असतं. खूप मज्जा आली असती, पण माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी हे वर्क केलं नसतं. असं यामुळे कारण चित्रपटात आमची जोडी ही एकत्र नव्हती. चित्रपटात शाहरुखच्या अपोजिट दीपिका पदुकोणला दिसली. त्यातही या चित्रपटात फक्त एकच फीमेल लीड होती आणि अभिषेकच्या अपोजीट कोणी नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी हे थोडं विचित्र झालं असतं. त्यातही जर मी या चित्रपटाला होकार दिला असता तर माझी जोडी अभिषेकशिवाय कोणा दुसऱ्यासोबत झाली असती. त्यामुळे मी चित्रपटाला नकार दिला.'


हेही वाचा : KBC 16 : स्पोर्ट्ससंदर्भातील प्रश्नाचं उत्तर न आल्याने करोडपती होता होता राहिली; तुम्हाला माहितीये का उत्तर?


दरम्यान, त्यांच्या कामाविषयी बोलायचं झाले तर ऐश्वर्या राय गेल्या वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पोन्नियिन सेलवन 2' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. आता ती गेल्या बऱ्याच काळापासून फक्त सिलेक्टिव चित्रपट करत आहे. तर आता ऐश्वर्या आता तिच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. तिच्यात आणि अभिषेकमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण बच्चन कुटुंबानं किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं काही प्रतिक्रिया दिली नाही. तर अभिषेकनं त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत या सगळ्या अफवा असल्याचं दाखवून दिलं होतं.