KBC 16 1 Crore Question : 'कौन बनेगा करोडपती 16' हा शो या महिन्यात सुरु झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये राजस्थानच्या सवाई माधोपुरची रोल ओव्हर स्पर्धक नरेशी मीना दिसली. नरेशीनं मागच्या एपिसोडमध्ये 50 लाख रुपये जिंकले होते. तर आता ती 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचली होती. पण तिनं या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर चुकीचं उत्तर दिलं आणि ती शोची पहिली करोडपती होऊ शकली नाही. आता तुम्ही देऊ शकता का या 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर...
नरेशी एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या जिद्दीनं आणि हुशारीनं ती केबीसीच्या हॉटसीटपर्यंत पोहोचली. तिचा खेळ पाहता बिग बींनी नरेशीची स्तुती केली आणि त्यासोबत आयुष्यातील संघर्षला मात करण्यासाठी लागणाऱ्या साहसाचे कौतूक केले. सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली ज्यात नरेशी तिच्या प्रोटोन थेरेपी विषयी बोलताना दिसते. त्यासाठी तिला 25-30 लाख रुपयांची गरज होती.
दरम्यान, नरेशीच्या वडिलांनी 50 मिनिटात 50 लाख रुपये कमावण्यावरून लेकीचं कौतुक केलं. नरेशीनं तिच्या प्रोटोन थेरेपीसाठी पैशांची मदत करण्यासाठी बिग बींचे आभार मानले.
त्यानंतर पुढे नरेशीनं 1 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं. पण इथवर पोहोचेपर्यंत नरेशीनं तिच्या 3 लाइफ लाईन वापरल्या होत्या. तर अमिताब बच्चन हे नरेशीला पुढचा प्रश्न वाचून दाखवतात.
लीला रो दयाल कोणाला हरवत विंबल्डन टेनिस चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली?
नरेशीनं या प्रश्नावर बरीच प्रतीक्षा केल्यानंतर तिनं ऑप्शन B आणि D मध्ये अडकल्याचे म्हटले. अशात नरेशीला कोणतंही चुकीचं उत्तर द्यायचं नव्हतं आणि तिनं शो सोडण्याचा निर्णय घेतला. नरेशीनं घोषणा केल्यानंतर ती ऑप्शन A ची निवड करते. मात्र, योग्य उत्तर हे ऑप्शन B ग्लेडिय साउथवेल आहे.
नरेशीनं हा खेळ सोडल्यानंतर बिग बी फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा आणखी एक राऊंड खेळतात आणि यावेळी बंगळुरू, कर्नाटकच्या प्रियंका पोरवार हॉट सीटवर येतात. शोची सुरुवात त्यांच्यापासून होते. आता आगामी एपिसोडमध्ये हा खेळ पाहायला मिळेल. दरम्यान, नरेशीला 2018 मध्ये ब्रेन ट्यूमर निदान झाले आणि 2019 मध्ये तिची एक सर्जरी झाली. खरंतर तिचा हा जो ट्यूमर आहे तो अशा ठिकाणी आहे जिथून काढता येणं खूप कठीण आहे. तर दुसरीकडे तिच्या आईनं तिच्या ऑपरेशनसाठी सगळे दागिने विकले.