Aishwarya Rai Sushmita Sen Cold War : बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये कॅट फाइटचे अनेक किस्से आहेत. श्रीदेवीपासून शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडनसह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वादाच्या बातम्या वाचायला मिळतात. या कोल्ड वॉरमधील अजून एक किस्सा आहे, ऐश्वर्या राय बच्चन आणि सुष्मिता सेन यांमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेच्या वेळी वाद होता अशा बातम्या समोर आल्या होत्या. नेमकं त्या दोघींमध्ये कशावरुन वाद होता आणि त्या एकमेकींशी का बोलत नाहीत, याबद्दल कुठलं कारण समोर आलं नव्हतं. (Aishwarya Rai Sushmita Sen Cold War Revealed After 30 Years The contestant maninee de said Between those two)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आज 30 वर्षांनंतर ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्यामधील वादाचे सत्य समोर आले आहेत. हा वाद 1994 मिस इंडिया स्पर्धेच्या वेळी झाल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. या स्पर्धेमधील सहस्पर्धक मानिनी डे हिने या सर्व प्रकरणाचा खुलासा केलाय. 


1994 मिस इंडिया स्पर्धेत नेमकं काय घडलं होतं?


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 'जस्सी जैसी कोई नही' आणि 'अम्मा अँड फॅमिली' यामधील मानिनी डे या अभिनेत्री 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत टॉप 10 स्पर्धकांच्या यादीत स्थान पटकावलं होतं. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने या स्पर्धेदरम्यान काय काय झालं होतं याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. 



सुष्मिता सेनेचं केलं कौतुक!


या मुलाखतीत मानिनी म्हणाली की, मला सुष्मिता सेनचं आभार मानायचं आहेत. कारण मिस इंडिया स्पर्धेच्या आधी ती सुष्मिताला भेटली होती. हे त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा सुष्मिता मानिनीच्या माजी नवऱ्यासोबत काम करत होती. त्यावेळी आमची मैत्री झाली. ते मध्यरात्री मला कविता वाचून दाखवायची. तिने नेहमी म्हणायची माझ्या कविता ज्या व्यक्तींना समजतात त्यापैकी तू एक आहेस. तिनेच मला मिस इंडिया स्पर्धेसाठी फॉर्म भरायला लावलं. तिने माझ्या हात धरला आणि मला फॉर्म भरण्यास प्रोत्साहन दिलं. ती पहिली व्यक्ती आहे जिने मला म्हटलं तू खूप सुंदर आहेस. खरं तर एक महिला दुसऱ्या महिलेला सुंदर म्हणतं नाही. त्यामुळे तिचं हे वाक्य मला खूप आवडलं. 



'त्या दोघींमध्ये...'


या मुलाखतीत तिने ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्या वादावरही भाष्य केलं. खरं तर तिने या स्पर्धेच्या वेळीची सत्य घटना समोर आणली. या दोघींमध्ये कोणताही वाद नव्हता असं तिने स्पष्टपणे सांगितलंय. 'या दोघींमधील वाद मीडियाने निर्माण केला होता, असं तिचं म्हणं आहे. या दोघी स्पर्धेदरम्यान एकमेकींशी बोलायच्या आणि आदराने वागायच्या. त्यावेळी ऐश्वर्या राय आधीपासून एका साबणाच्या ब्रँडची मॉडेल होती. तर सुष्मिताचं फार नाव झालं नव्हतं. त्यामुळे तिला आम्ही बाकी स्पर्धेक काय टक्कर देणार. '