Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या बातम्यांमुळे बच्चन कुटुंब नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिले आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र, अद्याप यावर बच्चन कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटाच्या बातम्या जेव्हा पसरल्या तेव्हा पासून ऐश्वर्या राय फक्त तिची मुलगी आराध्यासोबत दिसायला लागली. तर बाकीचे बच्चन कुटुंब एकत्र दिसू लागले. मात्र, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं नातं नेहमीच खूप घट्ट मानलं जातं. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 


ऐश्वर्यामुळे दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ


अमिताभ बच्चन यांनी एकदा एका मुलाखतीत स्वत: चे आणि ऐश्वर्या रायचे जुने किस्से सांगत होते. त्यामधील एक किस्सा 'खाकी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा होता. या घटनेबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांना दोन दिवस झोप येत नव्हती. कारण, 2004 मध्ये 'खाकी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती. जेव्हा ऐश्वर्या रायला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 


चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायच्या कारचा अपघात


अमिताभ बच्चन म्हणाले की, नाशिकमध्ये 'खाकी' चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना एका सीन दरम्यान तुषार आणि ऐश्वर्या रायच्या कारचा अपघात झाला. स्टंटमनच्या चूकीमुळे हा अपघात झाला. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ऐश्वर्या गंभीर जखमी झाली होती. या अपघाताची आठवण करून देताना अमिताभ बच्चन म्हणाले, मी दोन रात्री झोपू शकलो नाही. कारण हे सर्व मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले होते. ऐश्वर्याला खूप गंभीर दुखापत झाली होती. पण सगळेच तिच्या दुखापतीला किरकोळ म्हणत होते. 


ऐश्वर्यासाठी अमिताभ बच्चन यांनी बोलावले खाजगी जेट


ज्यावेळी ऐश्वर्या रायला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायच्या आईला विचारले की तिला तिला मुंबईला परत न्यायचे आहे का? ऐश्वर्या रायच्या आईने हे मान्य केल्यावर अमिताभ बच्चन यांनी अनिल अंबानी यांच्याशी बोलून त्यांच्या खाजगी जेटची व्यवस्था केली होती. मात्र, त्यावेळी नाशिकमध्ये रात्री जेट लँड करण्याची सोय नव्हती. त्यामुळे हॉस्पिटलपासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या लष्करी तळावर खाजगी जेट उतरवण्यात आले. त्यासाठी त्यांना दिल्लीहून परवानगी घ्यावी लागली होती. त्यावेळी ऐश्वर्या रायला आरामात घेऊन जाण्यासाठी जेटमधून सीटही काढाव्या लागल्या होत्या.