कुणीतरी येणारं गं? बॉलिवूड अभिनेत्रीच्या गरोदरपणाची का होतेय इतकी चर्चा?
भिनेत्री काजल अग्रवाल सध्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
मुंबई : अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काजल आणि तिचा पती गौतम किचलू लवकरच आई-वडील होणार असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये काही दिवसांपासून सांगितलं जात आहे. दरम्यान, काजल अग्रवालचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचं बेबी बंप दिसत असल्याचं बोललं जात आहे.
फोटोमध्ये दिसला काजलचा बेबी बंप?
अलीकडेच काजल अग्रवालने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजल अग्रवाल तिची बहीण निशा अग्रवाल आणि तिच्या मुलांसोबत पोज देताना दिसत आहे. फोटो पाहता, प्रेग्नेंसीमुळे काजल अग्रवालचा बेबी बंप दिसतोय. हा फोटो समोर येताच लोकांनी काजलच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. मात्र, काजल आणि तिचा पती गौतम यांनी अद्याप गरोदरपणाबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर काजोलचं मौन
नुकतंच काजल अग्रवालने गरोदरपणाच्या बातम्यांबाबत मौन तोडलं आहे. एका पोर्टलशी झालेल्या संभाषणात काजलने स्पष्टपणे सांगितलं होतं की, योग्य वेळ आल्यावर ती स्वतः याबद्दल बोलेल. मात्र, यादरम्यान तिने गरोदरपणाची बातमी नाकारली किंवा स्वीकारली नाही.