अजय देवगण ठरला बॉलिवूडचा सिंघम
अजय देवगणसाठी ही दिवाळी चांगली ठरली आहे. गोलमाल रिटर्न सर्वात मोठी फिल्म बनली आहे. गोलमेला अगेनने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 171 लाखापेक्षा अधिकची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 4.33 कोटी रुपये कमावले. रिलीझच्या दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा गर्दी खेचण्याचं काम करतोय. चित्रपटाने सोमवारी 7.25 कोटी कमावले, शनिवारी 10.61 कोटी आणि रविवार रोजी 13.58 कोटींची कमाई केली आहे.
मुंबई : अजय देवगणसाठी ही दिवाळी चांगली ठरली आहे. गोलमाल रिटर्न सर्वात मोठी फिल्म बनली आहे. गोलमेला अगेनने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 171 लाखापेक्षा अधिकची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 4.33 कोटी रुपये कमावले. रिलीझच्या दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा गर्दी खेचण्याचं काम करतोय. चित्रपटाने सोमवारी 7.25 कोटी कमावले, शनिवारी 10.61 कोटी आणि रविवार रोजी 13.58 कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटातून अजय देवगण बॉक्स ऑफिसचा सिंघम बनला आहे. त्यांची फिल्म वर्ल्डवाइडही चांगली कमाई करत आहे. सिनेमा 200 कोटीपेक्षा जास्त कमाई करणारा ठरला आहे. गोलमाल अगेन सध्या 2017 मधला बॉलिवूडचा सर्वात यशस्वी सिनेमा ठरला आहे.
या वर्षी सलमान, शाहरुख आणि रणबीरच्या चित्रपटांमुळे लोक निराश झाले. तेव्हा अक्षय कुमार, वरुण धवन आणि आता अजयने बॉलिवूडला चांगला व्यवसाय करुन दिला आहे.