मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' ने विक्रमी भरारी घेत चार दिवसांत १०० कोटींचा गल्ला केला आहे. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ला मागे सारत 'गोलमाल अगेन'ने बाजी मारली आहे. मात्र कोट्यवधी कमावणाऱ्या या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणने मात्र काहीच मानधन घेतले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयने एक रुपयाही मानधन घेतलं नसलं तरी नफा कमावण्याचं त्याचं एक वेगळंच गणित समोर येत आहे. आता जरी त्याला या चित्रपटातून काहीच मिळालं नसलं, तरी पुढील तीन ते चार महिन्यांत त्याला याचा नफा मिळणार आहे. यामागचं कारण म्हणजे त्याने ‘गोलमाल अगेन’चे प्रसारणाचे अधिकार विकत घेतले आहेत.


सर्वसाधारणपणे, एखाद्या चित्रपटाच्या प्रसारणाचे अधिकार हे प्रदर्शनाच्या दोन ते तीन महिन्यांनंतर विकले जातात. चित्रपटाला किती यश मिळालं यावर त्याची किंमत ठरवली जाते. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असल्याने त्याच्या प्रसारणाच्या अधिकारासाठीही तगडी रक्कम दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. ‘गोलमाल’ सीरिजमधले चित्रपट अजूनही काही वाहिन्यांवर आठवड्याअखेर प्रसारित केले जातात. त्यामुळे प्रसारणाचे अधिकार विकत घेतल्याचा चांगलाच फायदा अजय देवगणला होणार आहे.