नाशिक : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने आज नाशिकच्या रामकुंडावर वडिलांच्या अस्थींचे विसर्जन केले. अजयचे वडिल वीरु देवगण यांचे 27 मे रोजी निधन झाले. विधिवत पूजा करत अजयने आपल्या वडिलांच्या अस्थी गोदावरी नदीत विसर्जित केल्या. यावेळी अजयला पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती. अजयच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि खाजगी सुरक्षारक्षक असल्याने रामकुंडावर छावणीचे स्वरुप आले होते. अस्थी विसर्जनादरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरु देवगण अनेक दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


वीरु देवगण यांनी कलाविश्वात मोलाचे योगदान दिले आहे. वीरु देवगण हे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन म्हणून ओळखले जात होते. यांनी सत्ते पे सत्ता, स्वर्ग से सुंदर, दस नंबरी, मिस्टर नटवरलाल, क्रांति, राम तेरी गंगा मैली, आखिरी रास्ता, मिस्टर इंडिया, फूल और कांटे, इश्क यांसारख्या 80हून अधिक चित्रपटांत अॅक्शन कोरियोग्राफर म्हणून काम केले होते. 


वीरु देवगण यांनी 'हिंदुस्तान की कसम' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. वीरू देवगण यांनी साहसी दृश्य दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाबरोबरच अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते. क्रांती (१९८१), सौरभ (१९७९) आणि सिंहासन( १९८६) या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. वीरु देवगण यांच्या जाण्याने कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.