नवी दिल्ली : बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'रेड' १६ मार्चला प्रदर्शित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात अजय देवगन लखनऊचे इनकम टॅक्स ऑफिसर अमेय पटनायक ही व्यक्तिरेखा साकारत आहे. जो काळा पैसा लपवणाऱ्या देशातील गद्दारांच्या घरी धाड टाकत असतो. 


काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पोस्टर रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याने आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेयर केल्या. काजोल सोबत लग्नानंतरच्या हनिमूनची एक आठवण त्याने सांगितली.


हनिमून सोडून पळालो 


आपण हनीमून अर्धवट सोडून पळून आल्याचे त्याने सांगितले. हनिमूनबद्दलचा हा किस्सा त्याने पहिल्यांदाच शेयर केला. हनिमूनसाठी मी आणि काजोलने २ महिने सुट्टी घेतली होती.


 मला हा वेळ खूपच मोठा वाटत होता. म्हणून मी हनीमून अर्धवट सोडल्याचे अजयने सांगितले. 


अर्ध्या तासात लग्न


आमच लग्न केवळ अर्ध्या तासात झाल्याचे त्याने सांगितले. लग्न उरकून मी लगेच घरात परतल्याचेही त्याने सांगितले.


रेड विषयी 


या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करत आहेत. या सिनेमात अजयसोबत इलियाना डिक्रूज देखील आहे. 'बादशाहो'मध्ये ही अजय-इलियानाची जोडी पाहायला मिळाली होती.


या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र 'बादशाहो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन करु शकला नाही.


त्यामुळे रेड सिनेमाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.