मुंबई : बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगन आजकाल आपल्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. अशावेळी अजय देवगणनं आपलं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. अजय देवगणला आता त्याचे नाव बदलावं आणि लोकांनी त्याला अजय म्हणणं सोडाव, असं त्याला वाटत आहे. मात्र हे का घडत आहे याबद्दलची मोठी माहिती समोर आली आहे, नुकताच अजय देवगणने सोशल मीडिया एक व्हीडिओ शेअर करत याची घोषणा केली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दुआ मे याद रखना, नाम है सुदर्शन" अशा आशयाचं कॅप्शन अजयनं या पोस्ट केलेल्या व्हिडीओला दिलं आहे, एवढच न्हवे तर अजयनं त्याच्या पोस्टला #एंटरटेनमेंटकाऑलराउंडर हा हॅशटॅग वापरला आहे.


अजय देवगणची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना फार आवडली, इतकेच नाही तर अजयचे चाहतेही त्याला सतत त्याच्या या पोस्टवर कमेंट करत या पोस्टमागील कारण विचारत आहेत. मात्र चाहत्यांना खात्री आहे की, अजय लवकरच त्याच्या फॅन्सशी या विषयावर पुन्हा चर्चा करेल.



अजय देवगण लवकरच आलिया भट्टसोबत गंगूबाई काठियावाडी सिनेमांत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहेत. या सिनेमांत अजय देवगन एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.


मात्र अद्याप अजय देवगणच्या भूमिकेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु सिनेमांत अजय करीम लालाच्या भूमिकेतही दिसू शकेल असा अंदाज आहे. गांगुबाईंच्या न्यायासाठी करीम लाला यांनी गांगुबाईंची बाजू मांडली ती व्यक्ती म्हणजे करीम लाला.


या सिनेमाच्या ट्रेलरननंतर आलियाचे सिनेमातील डायलॉग चर्चेत आहेत. गंगूबाई मुळात गुजरातच्या होत्या पण मुंबईत येवून त्यांनी आपला धाक निर्माण केला. मुंबईतील कामठीपुरा येथील रेड लाईट भागात जबरदस्तीने विकली गेलेली मुलगी मुंबईची लेडी डॉन कशी बनली त्याचीच ही कथा आलिया भट्टच्या सिनेमांमध्ये दाखविली जाणार आहे.