मुंबई : कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातलं आहे. शिवाय आता नव्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिलासा दायक बाब म्हणजे मुंबईतील धारावी आता कोरोनामुक्त झाली आहेत धारावीत करोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली. आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने यावर समाधान व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावी कोरोनामुक्त झाल्यानंतर अजय ट्विट करत म्हणाला, 'ख्रिसमस आपल्यासाठी आनंद घेऊन आलाय. धारावीमध्ये एकही करोनाचा रुग्ण नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपला आनंद व्यक्त केला.' त्याचं ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 



दरम्यान, कोरोना विरोधातील धारावी मॉडेल यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार, पोलीस, खाजगी डॉक्टर, स्वंयसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींची मुंबई महापालिकेला साथ मिळाली. १ महिन्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी धारावीतून एकाही कोरोना रूग्णाची नोंद झालेली नाही.


१ एप्रिलला पहिला रूग्ण धारावीत मिळाला होता, त्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी धारावीतून एकही रूग्ण मिळालेला नाही. सध्या धारावीत केवळ १२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी ८ होम क्वारंटाईन आहेत तर ४ जण सीसीसी २ मध्ये दाखल आहेत. धारावीतील आतापर्यंतची एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३७८८ असली तरी ३४६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.