मुंबई : प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं बॉलिवूड स्टार्ससाठी सर्वात सुरक्षित मार्ग आहे. म्हणूनच दररोज कलाकारांनी घर विकत घेतल्याच्या बातम्या समोर येत असतात. अलीकडेच एक बातमीसमोर आली आहे की, नुकतंच अजय देवगणने एक आलिशान बंगला विकत घेतला असून त्या घरासाठी त्याने प्रचंड कर्जही घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजयने विकत घेतला एक आलिशान बंगला 
अजय देवगणने नुकताच मुंबईच्या जुहूमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. ज्याची किंमत 47.5 कोटी आहे. हा बंगला त्याच्या घर शिवशक्तीपासून फारसा दूर नाही. अजयचा हा नवीन बंगला 4 474. square feetचा आहे, त्याचा हा नवा बंगला त्याची आई  वीणा वीरेंद्र देवगण यांच्या नावावर आहे. या घरासाठी अजयने सुमारे 19 कोटींचे कर्ज घेतल्याची बातमी आहे.


गेल्या वर्षी बंगला विकत घेतला
एका बातमीनुसार, अजय देवगणने हा बंगला डिसेंबर २०२० मध्येच विकत घेतला होता, तर या घरावर होमलोन यावर्षी एप्रिलमध्ये घेण्यात आलं आहे. भावेश बाळकृष्ण वालिया यांनी हा बंगला अजयला विकला आहे.


अजयचे चित्रपट
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर, अजय देवगण अखेर 2020मध्ये तानाजी चित्रपटात दिसला होता. अजयचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. 'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले.


 चित्रपटात अजयसोबत पत्नी काजोल व्यतिरिक्त सैफ अली खान, शरद केळकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. याशिवाय अजय लवकरच 'सूर्यवंशी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातही कॅमियो करताना दिसणार आहे. सध्या 'आरआरआर' चित्रपटाशिवाय अजयकडे 'भुज', 'मैदान', 'थँक्स गॉड' आणि 'मेडे' सारखे चित्रपट आहेत.