बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार करायचा `हे` काम, अजय देवगनने केला मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने एका मुलाखतीत अक्षय कुमारच्या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीचा समाचार घेतला आहे.
Ajay Devgn : रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगन आणि करिना कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे कॅमिओ भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसत आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने अक्षय कुमारचा सकाळी लवकर उठण्यावरून समाचार घेतला आहे. ज्यामध्ये अजय देवगनने तो पूर्वी 'दूधवाला' असल्याचे सांगितले आहे. अक्षय कुमारच्या लवकर उठण्याच्या सवयीवर अजय देवगनने हा टोमणा मारला अक्षय कुमारला मारला आहे.
अक्षय कुमार दूधवाला
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत अजय देवगनला अक्षय कुमारची एक सवय सांगण्यास सांगितले होते. ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. यावर अजय देवगन गंमतीने म्हणाला होता की, अक्षय कुमार पहाटे 4 वाजता उठतो. हे तुम्हाला माहिती असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का की तो आधी दूधवाला होता? अजय देवगनचे हे वाक्य ऐकून सगळेच जोरजोरात हसू लागले. अक्षय कुमारने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो सकाळी 4 वाजता उठतो आणि रात्री 9 किंवा 9.30 च्या आत तो झोपतो. अक्षय कुमारचा हा दिनक्रम कोणत्याही चित्रपटादरम्यान सारखाच असतो. मात्र, कधी कधी अक्षय कुमारच्या या सवयीमुळे त्याचे सहकलाकार नाराज होतात. कारण त्यांना देखील लवकर उठावे लागते.
'सिंघम अगेन'ने केला 200 कोटींचा आकडा पार
1 नोव्हेंबर रोजी अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 350 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला गेला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 291 कोटींची कमाई केली आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात अर्जुन कपूर हा खलनायक बनला आहे. ज्याचा या चित्रपटामधील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्यासोबतच कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.