नरकाचा दरवाजा... जगातील सर्वात रहस्यमयी खड्ड्यामधून येणाऱ्या भयानक आवाजांचे गूढ अखेर उकललं

रशियातील या महाकाय खड्डा नरकाचा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. 

| Nov 13, 2024, 20:19 PM IST

Siberia Permafrost : रशियाच्या सायबेरियन भागात असलेला महाकाय खड्डा हा संशोधकांसाठी मोठे रहस्य होते. 282 फूट खोल एक खड्डा आहे. हा खड्डा 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखला जातो. रशियातील सर्वात जुने खुले विवर आहे. 

 

1/7

जमीनीच्या पोटात दडलेल्या जगातील सर्वात मोठ रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आहे. हे रहस्य एका खड्ड्याच्याबाबतील आहे. 

2/7

 वर्षानुवर्षे या खड्ड्यात जमा झालेला नैसर्गिक गॅस (Natural Gas) बाहेर पडत आहे. हा गॅस खड्ड्याबाहेर पडताना स्फोटासारखा आवाज येत आहेत.  

3/7

सातत्याने येथील जमिनीखाली गोठलेला बर्फ वितळू लागला आणि येथे मोठा दलदलयुक्त खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यातून भयंकर आवाज येत आहेत. 

4/7

 हा खड्डा  0.8 चौरस किलोमीटर आकाराचा आहे. याचा आकार इतका मोठा आहे की यात  145 फुटबॉल मैदाने सामावू शकतात.    

5/7

पर्माफ्रॉस्ट हे वैज्ञानिक नाव आहे. पर्माफ्रॉस्ट म्हणजे जेथे जमीन, माती कोट्यावधी-अब्जावधी वर्षापासून हिमाच्छादित वातावरणात गोठलेली असते.  

6/7

सायबेरियात असलेला हा जगातील सर्वात मोठा पर्माफ्रॉस्ट खड्डा आहे.   

7/7

सायबेरियामध्ये हा खड्डा आहे.  40 हजार वर्षांपासून सायबेरियातील खड्यांमधुन येणाऱ्या भयानक आवाजांचे गूढ अखेर उकललं आहे.