मुंबई : अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनची लोकप्रियता एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिने अद्याप बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवलेलं नाही पण सोशल मीडियावर तिचा दबदबा कायम आहे. न्यासा देवगणचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिची परफेक्ट फिगर दाखवली आहे. तिने आपल्या नव्या लूकनं चाहत्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टाइलिश ड्रेसमध्ये न्यासाची हटके स्टाईल
हा फोटो न्यासा देवगणच्या इंस्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती ऑफ शोल्डर ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये न्यासा खूपच हॉट दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना पाहून तिच्या चाहत्यांच्या हृद्याचे ठोके वाढले आहेत. तिच्या स्टाईलमुळे चाहते तिचं जोरदार कौतुक करत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये तिचं जोरदार कौतुक करत आहेत. लोकं तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.



यूजर्सने केलं भरभरुन कौतुक
एका यूजरने लिहिलं की, तुम्ही सर्वात सुंदर स्टार किड्सपैकी एक आहात. तर दुसऱ्या एका युजर्सने कमेंट करत लिहीलं, मी तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही. त्याचबरोबर अजून एकाने लिहिलंय, दिवसेंदिवस तुझं सौंदर्य वाढतंच चाललं आहे. याचबरोबर काही लोकांनी फायर आणि हार्ट इमोजीद्वारे न्यासा देवगणचं कौतुक केलं आहे.