COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांनी घुमा सिनेमासाठी वणवा पेटला हे गाणं गायलं आहे. अजय गोगावले यांनी घुमा चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी हे गाणं गायलं आहे, वणवा पेटला या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा अनेक दिवसांनी अजय गोगावले यांच्या आवाजात नवीन गाणं ऐकण्याची संधी प्रेक्षकांना लाभणार आहे.


ग्रामीण भागातील कथा मोठ्या पडद्यावर येण्याचं प्रमाण तसं कमी असलं, तरी ज्या कोणत्या ग्रामीण कथा मोठ्या पडद्यावर येतात, त्या धमाल करून जात आहेत, नागराज मंजुळेचा सैराट, भाऊ कऱ्हाडेचा ख्वाडा, आणि आता महेश रावसाहेब काळे यांचा घुमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठीत सध्या घुमा सिनेमाकडे सर्वांची नजर लागून आहे.