मुंबई : नुकताच आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. या हायप्रोफाइल लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. स्वागत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे एका अनोख्या अंदाजात समोर आली. बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझाईनर अबू जानी-संदीप खोस्ला यांनी खास सोनालीसाठी लाल रंगाचा ड्रेस तयार  केला. सोनाली या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फार अप्रतिम दिसत आहे. सोनालीने  तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅंन्सरसारख्या गंभीर आजारावर सोनालीने तिच्या आत्मविश्वसाच्या जोरावर मात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



शनिवारी ९ मार्च रोजी आकाश - श्लोका विवाह बंधणात अडकले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे नव्याने तयार केलेल्या सम्मेलन केंद्रात लग्न समारंभ संपन्न झाला. लग्न सोहळ्यात अनेक सेलेब्रिटी, राजकारणी, क्रिडा-कला क्षेत्रतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थितीत होते.



त्याचप्रमाणे १० मार्च रोजी आकाश आणि नताशाचा स्वागत सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनालीने 'हाय ग्रेड' कॅन्सर झाल्याचे सांगितले होते. तेव्हापासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती. कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत गेलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली भारतात परतली आहे. या काळात ती नियमितपणे इन्स्टाग्रामवर फोटो टाकून आपले अनुभव सांगायची.