मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. मग ती प्रियंका चोप्रा असो वा रवीना टंडन. मात्र एक नाव असं देखील आहे जिच्यासोबत अक्षय कुमारचं अफेअर होतं. मात्र तिच्याबाबतीत खूप कमी लोकं जाणतात. आणि महत्वाची बाब म्हणजे याचं अभिनेत्रीमुळे अक्षय कुमारची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री एके काळी फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल देखील होती. तिचं नाव आहे पूजा बत्रा. असं सांगितलं जातं की, अक्षय सर्वात अगोदर पूजा बत्राला डेट करत होता. मीडियाच्या माहितीनुसार, अक्षयला बॉलिवू़डमध्ये पूजामुळे एन्ट्री मिळाली आहे. जेव्हा अक्षय पूजाला डेट करत होता तेव्हा ती मॉडलिंग करत होती. आणि तेव्हा अक्षय बॉलिवूडमध्ये कुठेच नव्हता. त्यामुळे तो तेव्हा तिच्यासोबत बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायचा आणि हेच कारण ठरलं त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीचं. 


एन्ट्री तर मिळाली पण त्यानंतरच हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. आणि पूजानंतर अनेकांसोबत अक्षयचं नाव जोडलं गेलं. आणि त्यानंतर अक्षयच्या जीवनात ट्विंकल खन्ना आली आणि त्याने २००१ साली तिच्याशी लग्न केलं. अक्षय आणि ट्विंकलचा सुखी संसार सुरू आहे आणि त्यांना आता २ मुले देखील आहेत. अक्षयच्या लग्नानंतर लगेगच पुढच्या वर्षी म्हणजे २००२ साली पूजा बत्राने ऑरथोपिडिशियन सर्जन डॉ. सोनू आहलूवालियासोबत लग्न केलं. मात्र पूजाने हा तडका फडकी घेतलेला निर्णय फार काळ टिकला नाही. २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे अक्षयपासून ही अभिनेत्री दूर होऊन सुखी मात्र झाली नाही.