नवी दिल्ली : अनेक वादातून तालून सुलाखून संजय लीला भन्सालींचा पद्मावत हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटमुळे अनेक चित्रपटांचे गणित बिघडले.


अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मनोज बाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. इतकंच नाही तर अय्यारी ची रिलीज डेट पुढे ढकल्यामुळे परि, हेट स्टोरी ४ आणि वीरे दी वेडिंगच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातच पद्मावत आणि पॅडमॅन एकमेकांसमोर ठाकणार आहेत. 


हे पॅडमॅनचे खरे यश


अक्षयने सोमवारी मुंबईतील झी न्युज द्वारे आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात सोनम कपूर आणि आर बाल्कीसोबत पॅडमॅनचे गाणे 'साले सपने' लॉन्च केले. त्याचदरम्यान पद्मावत आणि पॅडमॅन एकत्र प्रदर्शित झाल्याने पॅडमॅनच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल चिंता वाटते का, असा प्रश्न अक्षयला विचारताच तो म्हणाला, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल, याचा विचार मी करत नाही. हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही आहे.


आयएएनएसच्या वृत्तानुसार अक्षयने सांगितले की, मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर ३-४ तरुणांना मासिक पाळीविषयी बोलताना बघितले. मला असे वाटते, चित्रपटाचे खरे यश हे आहे. रोज सकाळी उठल्यावर मी सोशल मीडियावर नजर टाकताच माझ्या लक्षात येते, अनेक लोक मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलत आहेत. तर मला हे माझ्या चित्रपटाचे यश वाटते.