मुंबई : अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या या चित्रपटाची सआरीच टीम प्रमोशनच्या अंतिम टप्प्यात आहेत. 


अक्षय कुमारची जबरा फॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खिलाडी अक्षय कुमारचे चाहते जगभरात आहेत. मात्र त्यापैकी एका फॅनने त्याच्यासाठी एक खास गोष्टी केली आहे. 
दुबई स्थित शुभ्रता सिंह अक्षय कुमारची मोठी चाहती आहे. शुभ्रताने अक्षय कुमारच्या पॅडमॅनसाठी खास गोष्टी केली आहे. पॅडमॅनचं पोस्टर घेऊन तिने हजारो फीट्सवरून उडी मारली आहे. यावेळेस तिच्यासोबत पॅडमॅनचं पोस्टर आहे.  


खास व्हिडिओ केला शेअर  


अक्षय कुमारने शुभ्रताचा खास व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. बंजी जंपिंग या साहसी खेळामध्ये हजारो फीट्सवरून उडी मारताना तिने पॅडमॅनचं पोस्टर हातामध्ये धरलं होतं. 
अक्षयने शुभ्रताचा व्हिडिओ रिट्विट करताना तिच्या साहसाचं कौतुक केलं आहे. 


 




पॅडमॅनकडे सार्‍यांचे लक्ष 


मासिकपाळीच्या काळात स्त्रियांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष भविष्यात काही आजारांचे कारण बनते. पॅड आणि मासिकपाळीबाबत समाजात अनेक चुकीच्या समजुती आहेत. यावर भाष्य करणारा आणि समाजात जागृती निर्माण करणारा पॅडमॅन हा चित्रपट 9 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत अभिनेत्री सोनम कपूर, राधिका आपटे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.