मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'राम सेतू' (Ram Setu) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अक्षयच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आता या चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या स्टार कास्टच्या मानधनचा खुलासा करण्यात आला आहे. ज्यानुसार अक्षय कुमारने या चित्रपटासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारचे यापूर्वीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते, मात्र या सगळ्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी अक्षयला 50 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. 


जॅकलिन फर्नांडिस :  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) नाव सध्या खूप चर्चेत आहे. ती अक्षय कुमारच्या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटासाठी जॅकलिननं 4 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले आहे. ती अजूनही सुकेश प्रकरणात अडकली असली तरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने अभिनेत्रीच्या प्रतिमेला फायदा होणार आहे.


नुसरत भरुचा : अक्षयसोबत या चित्रपटात नुसरत भरुचाही (Nushrratt Bharuccha) दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी तिनं 3 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. नुसरत भरुचा पहिल्यांदाच अक्षयसोबत दिसणार आहे आणि हा चित्रपट तिच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. 


नास्सर: मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ स्टार नास्सर (Nassar) अक्षयच्या राम सेतू चित्रपटासाठी 45 लाख रुपये घेत आहे. नास्सर हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि नास्सरनं अक्षयसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांची जोडी 'राउडी राठोड'मध्ये एकत्र दिसली आहे.


अक्षयचा हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.