`त्या` जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात
इंस्टाग्रामवर ही अक्षयला विरोध
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र हा वाद कोणत्याही सिनेमाचा नसून जाहिरातीचा आहे. या जाहिरातीमध्ये अक्षयने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली आहे.
निरमा डिटरजंटच्या जाहिरात अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय असा आरोप त्याच्यावर होतोय.. या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलंय. या जाहिरातीमधून महाराजांचा अपमान करण्यात येतोय, याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता शिवप्रेमी करतोयेत..
या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन दरबारात परतलेले असताना त्यांचं औक्षण केलं जातं. एक महिला युद्धात मळलेल्या त्यांच्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. ज्यानंतर अक्षय कुमार म्हणतो, महाराज की सेना दुश्मनोंको धोना जानती हैं और अपने कपडे भी!” आणि त्यानंतर अक्षय कुमार आणि त्याच्यासह सगळे मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. जाहिरातीतल्या या सीनवरुन अक्षय कुमारने माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
या जाहीरातीची पोस्ट अक्षयने इंस्टाग्रामवर अपलोड केली आहे. या पोस्टवर देखील अनेक नेटीझन्सनी विरोध दर्शवला आहे. निषेध करत ही जाहिरात बंद करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.