OMG 2 Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या 'ओह माय गॉड 2' या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 'गदर 2' सोबत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तर त्याआधी अक्षयच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. हे पाहता सेंसर बोर्ड देखील सगळ्या गोष्टींती खूप जास्त काळजी घेत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या रिवायजिंग टीमनं चित्रपट पाहिला आहे. स्क्रीनिंगमध्ये सेंसर बोर्डाचा अध्यक्ष प्रसून जोशी देखील त्यावेळी स्वत: उपस्थित होते. दरम्यान, अशी माहिती आहे की निर्मात्यांना 20 सीन्स काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यासोबत एडल्ट सर्टिफिकेट म्हणजेच A सर्टिफिकेट देण्यास सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाला A सर्टिफिकेट देणे म्हणजे 18 वर्षाखालील मुले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहू शकत नाहीत. या सगळ्या प्रकरणामुळे अक्षय कुमार आणि ‘ओह माय गॉड 2’ च्या निर्मात्यांचं टेंशन वाढलं आहे. ‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, या संदर्भात निर्मात्यांना अद्याप ‘शो कॉज ’ नोटीस पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता चित्रपटाला वेळेत जर सर्टिफिकेशन मिळालं तर अक्षयचा चित्रपट हा वेळेत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होईल. जर चित्रपटाला वेळेत सर्टिफिकेट मिळालं नाही तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही पुढे ढकलावी लागेल अशी निर्मात्यांना चिंता आहे. कारण सध्या या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु असताना हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याची चांगली कमाई होईल असे अनेकांचे म्हणणे आहे.   


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली...


दरम्यान, हा चित्रपट 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर वेळेत चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालं तर 'गरद 2' या चित्रपटासोबत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देईल. कारण हा चित्रपट देखील 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर हा चित्रपट 'गदर' चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता आता त्याचा दुसरा भाग किती कमाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण जेव्हा 'गदर' प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी 'लगान' देखील प्रदर्शित झाला होता. मात्र, प्रेक्षकांनी सगळ्यात जास्त प्रतिसाद हा 'गदर' ला मिळाला होता