जगाला अमेरिका नाही भारत वाचवेल! अक्षय कुमारचं विधान चर्चेत; एलियन्सचाही उल्लेख
Akshay Kumar : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगत भारत सरकारकडे एक विनंती केली आहे.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार हा सध्या 'बडे मिया छोटे मियां' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सगळीकडे तो त्याच्या या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान असलेल्या एका कार्यक्रमात अक्षयनं सरकारकडे एक मागणी केली आहे. त्याशिवाय एक प्रश्नही विचारला आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय म्हणाला अक्षय...
अक्षय आणि टायगर श्रॉफ जे दोघं या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते दोघं या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं 'इंडिया टुडे कॉन्कलेव 2024' या कार्यक्रमात पोहोचल होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की अमेरिकेत जे बॉडी डबल असतात किंवा जे अॅक्शन करतात, त्यांना फार ओळख मिळते, त्याशिवाय त्यांना पुरस्कार देखील देण्यात येतात. जर ते त्यांच्या देशाचं नाव मोठं करत असतील तर त्यांची सरकार त्यांना प्रमोट करते. या चित्रपटात तुम्ही चुलुकचा वापर केला आहे. तर तुम्हाला वाटतं का की अशा गोष्टी भारतातही आल्या पाहिजे?
यावर उत्तर देत अक्षय कुमारनं उत्तर दिलं की "हो, यायला हवं. आम्ही लहाणपणापासून चित्रपट पाहिला आहे आणि आमच्या डोक्यात एक गोष्ट कायम टाकण्यात आली किंवा आम्ही ऐकलं की जर कधी दहशतवादी हल्ला झाला तर आम्हाला अमेरिका वाचवेल. कारण आम्ही नेहमीच हॉलिवूडचे चित्रपट पाहिले आहेत. जर एलियन्स आले तर कोण वाचवणार? अमेरिका वाचवेल. कोणीही कुठूनही हल्ला करेल, अमेरिका सगळ्यावर तोडगा काढू शकतो. मला या गोष्टीला बदलायचं आहे. जर काही झालं तर भारत वाचवेल. असं करण्याची माझी इच्छा आहे. मी सरकारला एक विनंती करतो की आम्हाला देखील एक संधी द्यावी, आमची जितकी एयरफोर्स आहे, आर्मी आहे, तसं तर त्यांच्याकडून खूप काही मिळतं. आणखी अनेक गोष्टींची गरज आहे. आम्हालाही दाखवायचं आहे की आयुष्यात जे काही होईल, भारत वाचवेल, भारत वाचवेल."
हेही वाचा : जेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! 'डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि...'
दरम्यान, पुढे 'बडे मिया छोटे मियां' या चित्रपटाविषयी सांगत अक्षय म्हणाला, आम्ही 'जॉर्डन', 'ग्लासगो', 'स्कॉटलॅन्ड', 'अबू धाबी' सारख्या ठिकाणी शूट केलं आणि या चित्रपटाच्या मदतीनं एक बार सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.