मुंबईः अक्षय कुमारने त्याच्या बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपटाची आणखी एक झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये खिलाडी कुमार एका हातात मशाल घेऊन नव्या लूकमध्ये दिसत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम सेतू' चित्रपटाच्या या नवीन पोस्टरमध्ये अक्षय कुमारशिवाय जॅकलिन फर्नांडिस आणि सत्यदेव दिसत आहेत. हे चित्र पाहून असे दिसते की या तिन्ही स्टार्सना काहीतरी पाहून आश्चर्य वाटलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं, तर दुसरीकडे त्याच्या हातातील मशाल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.



'राम सेतू' चित्रपटाची ही झलक शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले - 'राम सेतूच्या जगाची झलक. दिवाळीला 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन आणि सत्यदेव यांच्याशिवाय नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत आहे. अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत तर विक्रम मोटवानी चित्रपटाचे निर्माते आहेत.


यापूर्वी, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले होते. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटाच्या स्टोरी लाईनबद्दल सांगायचे तर, क्रिती सॅनन चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत आहे, ज्याला बच्चन पांडे नावाच्या खतरनाक गुंडावर चित्रपट बनवायचा आहे. याशिवाय रितेश देशमुख, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा आणि अभिमन्यू सिंह हे देखील चित्रपटात दिसले होते.