खिलाडी अक्षय कुमारवर आली प्रॉपर्टी विकण्याची वेळ; जाणून घ्या अभिनेत्याने असं का केलं?
बॉलीवूड इंडस्ट्रीमधून अनेकदा बातम्या येतात की या स्टारने नवीन घर घेतलं किंवा कलाकाराने त्याची मालमत्ता विकली आहे.
मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून अनेकदा बातम्या येतात की या स्टारने नवीन घर घेतलं किंवा कलाकाराने त्याची मालमत्ता विकली आहे. आता बातमी येत आहे की अॅक्शन स्टार अक्षय कुमारने त्याची अंधेरी वेस्टची प्रॉपर्टी विकली आहे. अक्षय कुमारची ही मालमत्ता संगीतकार डब्बू मलिकला विकण्यात आली आहे. अक्षय कुमारने अंधेरी पश्चिम येथे 4.12 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी खरेदी केली होती. डब्बू मलिक हे लोकप्रिय संगीतकार अरमान मलिक आणि अमाल मलिक यांचे वडील आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारची ही प्रॉपर्टी अंधेरी वेस्टमधील ट्रान्सकॉन ट्रायम्फ टॉवरमध्ये आहे. त्यांची ही मालमत्ता १२८१ स्क्वेअर फूटमध्ये आहे. याशिवाय 59 फूटांची बाल्कनीही आहे. हा करार अक्षय कुमार आणि डब्बू मलिक यांच्यात ऑगस्ट 2022 मध्ये झाला होता. डब्बू मलिक आणि त्याची पत्नी ज्योती मलिक यांनी ही मालमत्ता अक्षय कुमारकडून 6 कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
या संपत्तीशिवाय अक्षय कुमारच्या अंधेरी पश्चिम आणि पूर्व भागात अनेक मालमत्ता आहेत. मुंबईतील बोरिवली, मुलुंड आणि जुहू येथेही त्याची मालमत्ता आहे. मुंबईतील बंगला आणि प्रॉपर्टी व्यतिरिक्त अक्षय कुमारची देश-विदेशातही प्रॉपर्टी आहे. पण जेव्हा त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्याचे चाहते मात्र यावर नाराजी व्यक्त करतायेत. अनेक युजर्स त्याला त्याने असं का केलं असही विचारत आहे. तर अजून एका युजर्सने कमेंट करत विचारलं फ्लॉपवर फ्लॉप होणाऱ्या सिनेमामुळे अक्षय कुमारने मुंबईतील प्रॉपर्टी विकली असावी. अशा अनेकप्रकारच्या कमेंट अभिनेत्याच्या पोस्टवर युजर्स करताना दिसत आहेत. (Akshay Kumar sold his property to this music composer for 6 crores earned so much profit)
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'काठपुतली' चित्रपटात शेवटचा दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग होती. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. तो आता 'राम सेतू', 'सेल्फी', 'गोरखा', 'ओएमजी 2', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'कॅप्सूल गिल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. अक्षय कुमार एका वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओळखला जातो.