हाऊसफुल्ल 4 च्या शूटिंगला सुरूवात, अक्षय कुमारने ट्विट केला खास फोटो
हाऊसफुल्लच्या 3 सिरीजनंतर आता त्याचा चौथा भागदेखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : हाऊसफुल्लच्या 3 सिरीजनंतर आता त्याचा चौथा भागदेखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊसफुल्ल 4' चं शूटिंग सुरू झाल्याची माहिती आज अक्षय कुमारने शेअर दिली आहे. हाऊसफुल्ल सिरीजच्या चौथ्या भागातही रितेश देशमुख प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे.
सुपरहीट सिरीज
हाऊसफुल्ल सिरीजमधील तिन्ही चित्रपट बॉकऑफिसवर सुपरहीट ठरला आहे. त्यामुळे चौथ्या भागाकडूनही रसिकांना अपेक्षा आहेत. हाऊसफुल्लच्या चौथ्या भागामध्ये बॉबी देओल पहिल्यांदा झळकणार आहे. नुकताच सलमान खानसोबत बॉबी देओल 'रेस 3' या सिनेमामध्ये झळकला होता. यापूर्वी 'यमला पगला दिवाना' आणि ' हम तो मोहब्बत करेगा' अशा विनोदी सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे.
तगडी स्टारकास्ट
हाऊसफुल्ल 4 मध्ये रितेश देशमुख, बॉबी देओल, अक्षय कुमारसोबत क्रिती सेनन आणि कृति खरबंदा या अभिनेत्री झळकणार आहेत. दिग्दर्शक साजिद खानने केलेल्या ट्विटनुसार, 'हाऊसफुल 4' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.