मुंबई : अक्षय कुमारच्याआगामी सिनेमा पॅडमॅनचे पोस्टर नुकतेच जारी करण्यात आले आहे.


अक्षयचा देसी लूक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टरमध्ये कुर्ता-पायजमा घातलेला, देसी लूकमधला अक्षय कुमार दिसून येत आहे. 


पोस्टर रिलीज


अक्षय कुमारने हे पोस्टर ट्विटरवर शेअर करत त्यावर कॅप्शनही लिहिले आहे. 


" सुपरहिरो आहे हा वेडा, येतोय २६ जानेवारी २०१८ ला : पॅडमॅन"



सिनेमाची कहाणी 


या सिनेममाची कहाणी अरुणाचलम मुरुगनाथम नावाच्या व्यक्तिच्या आयुष्यातून प्रेरीत आहे. अरुणाचलम यांनी महिलांसाठी परवडणाऱ्या किंमतीत सॅनेटरी नॅपकीन बनविण्यासाठी खूप वर्षे संघर्ष केला.  त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले.



 'पागल सुपरमॅन' 


सिनेमात अरुणाचलमचे कॅरेक्टर अक्षय कुमार करत असल्याने त्याने 'पागल सुपरमॅन' असे कॅप्शन या दिले आहे. 


२६ जानेवारीला रिलीज


या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २६ जानेवारी २०१८ हा सिनेमा रिलीज होणार आहे.