मुंबई : असं म्हटलं जातं की, मुलगी लवकर मोठी होती. यामुळे प्रत्येक बापाला असं वाटत असतं की, आपल्या मुलीने लहानच रहावं आपल्या मांडीवर तिने खेळावं अशी इच्छा असते. असंच काहीस बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारला वाटत असल्याचं समोर आलं आहे. अक्षय कुमारने आपल्या मुलीच्या 6 व्या वाढदिवसाला एक इमोशनल मॅसेज सोशल मीडियावर मॅसेज लिहिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलांच्या बाबतीत अक्षय कुमार जास्त भावूक आहे. मुलगी नितारासाठी त्याच्या मनात अधिक प्रेम आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 



अक्षय कुमारने मुलगी नितारासोबतचा स्विमिंग पूलचा फोटो शेअर केला आहे. मला तू आतापर्यंत अनेक प्रेम दिलं आहे. मी याचा कधी विचारही केला नव्हता. प्लीज तू लवकर मोठी होऊ नकोस. कारण मी अजूनही एकटं पोहोयला शिकलो नाही. हॅप्पी 6th बर्थ डे प्रिंसेस.... हा मॅसेज वाचून लक्षात येऊ शकतं की अक्षय आपल्या मुलीवर किती प्रेम करतो. 



ट्विंकलने देखील पापा अक्षयसोबत शेअर केला फोटो निताराची आई ट्विंकल खन्नाने देखील मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने अक्षय कुमार आणि निताराचा खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. अक्षय कुमारच्या अंगावर नितारा मोरपंख घेऊन खेळत होती. गेल्यावर्षी निताराच्या वाढदिवसादिवशी एक व्हिडिओ शेअर केला.