अभिनेता अक्षयकुमारने घेतला `हा` मोठा निर्णय...चाहत्यांनी केलं कौतुक
एका पानमसाला कंपनीची जाहिरात केल्याने अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. त्यानंतर अक्षयने घेतला एक मोठा निर्णय
मुंबईः अभिनेता अक्षयकुमारने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक ओळख तयार केली आहे. वेळोवेळी गरजूंच्या मदतीला धावून जात अक्षयने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. अक्षयच्या या आदर्श प्रतिमेला मात्र एका जाहिरातीने तडा गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अक्षयला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. पानमसाला, तंबाखू अशा पदार्थांची जाहिरात करणार नाही असं काही वर्षांपूर्वी अक्षयने एका मुलाखतीत जाहीरपणे सांगितलं होतं मात्र नुकतंच त्याने एका पानमसाला ब्रँडसोबत जाहिरातीचा करार केल्याने अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. अक्षयकुमारला नेटकऱ्यांनाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
शाहरूख खान, अजय देवगन आणि अक्षयकुमार या जाहिरातीत झळकले आहेत. या जाहिरातीमुळे शाहरूख आणि अजयला फारसा फरक पडलेला नाही. मात्र अक्षयकुमारला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे
सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर मात्र अक्षयने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपला हा निर्णय अक्षयने ट्विटरवर शेअरही केला आहे
सोशल मीडियावर झालेल्या या टिकेनंतर अक्षयने पानमसालाच्या ब्रँडसोबत केलेला करार मागे घेतला आहे. तसंच जाहिरातीतून आलेले पैसे चांगल्या कामासाठी वापरण्याचं ठरवलं आहे.
कराराचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कंपनीकडून ही जाहिरात सुरूच राहिल मात्र यापुढे अंमली पदार्थांची जाहिरात करणार नाही असं सुद्धा अक्षयने त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे. हा करार मागे घेत अक्षयने पुन्हा आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.