वाढदिवसानिमित्त अक्षयचा मुलीसाठी खास संदेश...
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीचा आज ५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अक्षयने सोशल मीडियावर १० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीचा आज ५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अक्षयने सोशल मीडियावर १० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षयची मुलगी त्याच्या चेहऱ्यावर शेव्हिन्ग क्रीम लावत आहे आणि काही बडबडत आहे. या व्हिडिओतून बाप लेकीच्या हळव्या, प्रेमळ नात्याचे दर्शन घडते.
या व्हिडिओला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले आहे, ''माझ्या प्रत्येक दिवसाचा सगळ्यात सुंदर भाग... माझी मुलगी शेव्ह करताना... मौल्यवान क्षण... हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस... फक्त एकच विनंती... कधी मोठी होऊ नकोस..." अक्षयचा हा नितारासाठी असलेला सुंदर संदेश वाचून नक्कीच तुम्ही देखील भावुक व्हाल.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चायलेंज' च्या जज च्या रूपात अक्षय लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबरपासून स्टार प्लसवर प्रसारीत होईल. त्याचबरोबर त्याचे 'गोल्ड' या आगामी चित्रपटासाठी शूटींग देखील चालू आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक अक्षयच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटातून मौनी रॉय देखील मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.