Alia Bhatt - Ranbir Kapoor Daughter :  अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंतर कपूर, भट्ट कुटुंबासोबत चाहते देखील रणबीर आलियाच्या बाळाच्या (Ranbir Alia baby girl) प्रतीक्षेत होते. आता चाहते आलियाच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्याआधी आलिया-रणबीरच्या लेकीच्या नावाची चर्चा रंगत आहे. (alia and ranbir movie)


रणबीर-आलियाच्या लेकीचं नाव   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रणबीर-आलियाच्या लेकीचं नाव आणि चिमुकलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरने लेकीचं नाव ठरवलं असून, लवकरचं नावाची घोषणा करतील. (alia ranbir baby photo)



रिपोर्टनुसार, रणबीर-आलिया यांच्या लेकीच्या नावाचं कनेक्शन दिवंगत अभिनेते आणि वडिल ऋषी कपूर यांच्याशी असेल असं सांगण्यात येत आहे. म्हणून रणबीर-आलिया कधी लेकीच्या नावाची घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


नीतू कपूर झाल्या भावुक 
रिपोर्टनुसार, लेकीच्या नावाबद्दल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे विचार जाणून घेतल्यानंतर नीतू कपूर भावुक झाल्या. नव्या पाहुण्याच्या आगमनाने नीतू कपूर प्रचंड आनंदी आहेत. 'ते आतापर्यंतचं सर्वात गोंडस बाळ आहे' असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 


वाचा : आई झाल्यानंतर Alia Bhatt इन्स्टाग्रामवर सक्रिय, खास फोटो पोस्ट करत म्हणाली...


 


मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय


आलिया आणि रणबीर बाळाला सर्वांपासून दूर ठेवू इच्छितात. कारण तिला कोणताही संसर्ग होऊ नये. बाळ (alia bhatt and ranbir kapoor baby) अजून लहान आहे, अशा परिस्थितीत तिला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.  म्हणून सध्या कोणताही पाहुण्याने किंवा सेलिब्रिटीने बाळाला भेटायला येऊ नये असं आलिया-रणबीरला वाटतं.