मुंबई : बॉलिवूडची सर्वात क्यूट जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. एखाद्या कार्यक्रमात, लग्न समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये देखील दोघ एकत्र दिसतात. दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा  खुलासा देखील केला आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर लग्न कधी करणार असा प्रश्न सतत त्यांच्या चाहत्यांकडून विचारला जातो. दरम्यान आलिया आणि रणबीर 2022मध्ये  लग्न करतील आणि 2037मध्ये विभक्त होतील असा अंदाज केआरकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तवला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाल राशिद खान (Kamaal R Khan) कायम त्यांच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके कामय बॉलिवूडचा कोणताही मुद्दा उचलून धरतो. त्याचे पोस्ट चर्चेत देखील असतात. आता केआरके आलिया आणि रणबीरवर निशाणा साधला आहे. त्याने आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे.


केआरके ट्विट करत म्हणाला, '2022 वर्षांखेर रणबीर आणि आलियाचं लग्न होईल. पण रणबीर कपूर लग्नाच्या 15 वर्षापूर्वीचं आलियाला घटस्फोट देईल.' म्हणजे  केआरकेच्या मते 2037 पर्यंत आलिया आणि रणबीर विभक्त होवू शकतात. सध्या केआरकेचे हे ट्विट तुफान चर्चेत आहे.