मुंबई : बॉलिवूडमधील कपूर आणि भट्ट कुटुंबात एका गोंडस आणि छोट्या परीचं आगमन झालंय. एप्रलिमध्ये रणबीर-आलियाने लग्न केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आनंदाची बातमी दिली आणि सगळ्यांच आश्चर्यचा धक्का बसला होता. त्यानंतर सगळे वाट पाहत होते की, आलियाला काय होणार आहे याची, 6 नोव्हेंबरला आलिया-रणबीरच्या घरी छोटीशी परी आली. त्यानंतर कूपर-भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आलियाने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिली होती. मात्र आता एक बाबतमी समोर येतेय ती म्हणजे सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले. या जोडप्याने त्यांचं लग्न खाजगी ठेवलं होतं. ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या जवळच्या मित्रांव्यतिरिक्त चित्रपटातील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.  14 एप्रिल 2022 रोजी रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न झालं.


आलिया भट्टने लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच त्यांच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. नुकतीच ही अभिनेत्री आई देखील झाली आहे. आणि तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर कपूर दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती जी खरोखरच धक्कादायक होती.



रणबीर आणि आलियाच्या लग्नाला 7 महिने उलटले आहेत. दरम्यान, केआरके म्हणजेच कमाल रशीद खानचे एक विधान समोर येत आहे जाणून घेऊया काय आहे हे विधान?


केआरकेने रणबीर आणि आलियाच्या लग्नाची भविष्यवाणी 1 वर्षापूर्वी केली होती. केआरकेने 'रणबीर कपूर आणि आलिया भट्ट वेडिंग' 2022 च्या अखेरीस लग्न करणार असल्याचम सांगितलं होतं. पण रणबीर कपूर लग्नानंतर १५ वर्षांत आलियाला घटस्फोट देणार आहे. म्हणजेच केआरकेच्या मते रणबीर 2037 पूर्वी आलियाला घटस्फोट देईल. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला 2 महिने उलटून गेले आहेत. म्हणजे KRK च्या मते ते कधीही घटस्फोट घेऊ शकतात?


ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही केआरकेने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींबद्दल ट्विट केलं होतं जे चुकीचं ठरलं. आपल्या वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. केआरकेच्या या ट्विटनंतर यूजर्सनी केआरकेचा क्लास घेतला होता. एका यूजरने म्हटलं की, तुमचं कोण ऐकतं?, तर दुसऱ्या यूजर्सने म्हटलं की तुमच्यात हिम्मत असेल तर भारतात येऊन बोला!