मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर आणि जगभरात बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाची चर्चा सुरु असताना आता आलिया भट्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती मीडियाची माफी मागताना दिसत आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय? 
आलिया भट्ट (Alia Bhatt) करण जोहरच्या (karan Johar) धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझीला पाहून अभिनेत्रीने तिच्या कारची खिडकी उघडली होती. आलियाने तिच्या कारमध्ये बसल्या बसल्या फोटोग्राफर्सना पोज दिला. यावेळी आलिया पापाराझींला म्हणाली की, माफ करा, मी चालू शकत नाही. आलिया (Alia Bhatt) प्रेग्नंट आहे आणि ती सध्या मीडियाच्या गर्दीपासून स्वतःला दूर ठेवत आहे.आलिया भट्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मीडियाची माफी मागताना दिसत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by @varindertchawla


कमाई किती? 
ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाने पहिल्या दिवशी 31.5 कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 37.5 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 39.5 कोटींची कमाई केली. पहिल्या वीकेंडला चित्रपटाची एकूण कमाई 107 कोटींच्या पुढे गेली आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला असतानाच जगभरातील कमाईने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 


अमिषा पटेलने सर्वच मर्यादा ओलांडल्या, 'तो' VIDEO केला शेअर


अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटात आलिया भट्टशिवाय  (Alia Bhatt) रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन दिसत आहेत. रणबीर आणि आलियाने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. आता हा चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आणखी किती कमाई करतो हे पाहावे लागणार आहे.