मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून आलिया भट्टची जोरदार चर्चा रंगली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर डेट करत असल्याची बातमी समोर येत आहे. तसेच आलिया भट्ट ब्रम्हास्त्र या सिनेमातून रणबीर कपूरसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं सगळं असलं तरीही एक चर्चा आता पुन्हा एकदा नव्याने होत आहे. ती चर्चा म्हणजे आलिया भट्ट ही महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण अशी अफवा स्वतः आलिया भट्टच्या कानावर येत असल्याचं तिने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द ईअर या सिनेमातून चर्चेत आली. यासिनेमाची टीम जेव्हा 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आली होती. तेव्हा करण जोहरने आलियाला एक प्रश्न विचारला होता की, तुझ्याबद्दल एकलेली तू सर्वात मोठी अफवा कोणती. तेव्हा कोणताही मागचा पुढचा विचार न करता आलियाने मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी असल्याचं सांगितलं. त्यावेळी तिच्यासोबत सिनेमातील अभिनेता वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा होता. आणि ते दोघे देखील तिच्या या उत्तराने अतिशय चक्रावले. 



रॅपिड फायर राऊंडमध्ये करण जोहरने तिला हा प्रश्न विचारला होता. त्यामुळे तिने त्या प्रश्नावर एवढंच उत्तर देऊन थांबली. पण हे उत्तर चक्रावणारे होते हे नक्की.