Good News : लग्नाआधीच Alia Bhatt च्या हातून घडली मोठी गोष्ट?
2021 हे वर्ष संपणार आहे
मुंबई : 2021 हे वर्ष संपणार आहे आणि त्यासोबतच नवीन वर्षाची नवी स्वप्ने जपण्याची वेळ आली आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन वर्षात जिथे असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या लाईफ पार्टनरसोबत एक नवीन प्रवास सुरू करणार आहेत, तिथे असे काही स्टार्स देखील आहेत ज्यांना करिअरच्या बाबतीत काहीतरी वेगळे करण्याचा मार्ग सापडेल. बॉलिवूडनंतर ते हॉलिवूड इंडस्ट्रीत हात आजमावणार आहे.
या यादीत बरीच नावे असली तरी, ज्यांनी अगदी लहान वयात हे स्थान मिळवले आहे, जे अनेकदा चांगले कलाकार करू शकले नाहीत. त्यात आता आलिया भट्टचं नाव पुढे आलं आहे. तिच्या प्रेमाचे किस्से तर सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये खूप ऐकायला मिळत आहेत.
ही एजन्सी आलिया भट्टसाठी शोधणार काम
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने एका अमेरिकन टॅलेंट एजन्सीशी संपर्क साधला आहे. 'विलियम मॉरिस एंडेव्हर' असे या एजन्सीचे नाव आहे. या एजन्सीमुळे आता हॉलिवूडमध्ये आलिया भट्टला संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
आलिया चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. तिला चांगली ऑफर मिळताच, ती हॉलिवूड स्टुडिओसोबत काम करण्यास तयार आहे. 2022 च्या सुरुवातीला घोषणा करण्यास उत्सुक आहे.