Alia Bhatt Due Date and Pregnancy Delivery: गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), डार्लिंग्ज (Darlings) आणि ब्रह्मास्त्र (Brahmastra) यांसारख्या पाठोपाठ यशानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt ) आता नवीन रोलसाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडमधील लव्ह बर्ड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट लवकरच आई-बाबा होणार आहेत. लव्हबर्ड्सने एप्रिल 2022 मध्ये लग्न केले  (Alia Ranbir Wedding) आणि त्यानंतर जून महिन्यात सोशल मीडियावर (Social media) गूड न्यूज शेअर केली. त्यानंतरही ही जोडी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक वेळा दिसून आली. नुकतचं मोठ्या थाट्यामाट्यात आलियाचं डोहाळजेवण (Baby shower) करण्यात आलं. असं म्हटलं जातं आहे की, आलिया भट्ट कपूर कुटुंबाची सून कपूर कुटुंबाची (Kapoor family) परंपरा पुढे नेणार आहे, यावर चर्चा सुरु झाली आहे. बाळाच्या पालनपोषणासाठी आलियाही सिनेसृष्टीपासून दूर जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


कधी येणार कपूर कुटुंबाचा नातू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची ड्यू डेट जवळ (Alia Bhatt Due Date) आली आहे. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कधीही बाळ होण्याची अपेक्षा आहे. 



कुठल्या रुग्णालयात होणार डिलिव्हरी?


पिंकविलाच्या (Pinkvilla)  एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, आलियाची डिलिव्हरी एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये (H N Reliance hospital) होणार असल्याची माहिती कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्राने रिपोर्टमध्ये असंही सांगितलं आहे की, कपूर कुटुंबाने या हॉस्पिटलमध्ये आलियाचं नाव आधीच नोंदवलं आहे म्हणजेच तिच्या प्रसूतीसाठी खोली देखील बुक केली आहे. (Alia Bhatt Due Date and delivery hn reliance hospital nmp)



आलिया सोशल मीडियावर सक्रीय


आलिया भट्ट ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशानंतर आता आराम करत आहेत. पण सोशल मीडियावर ती रोज आपले फोटो शेअर करते. शिवाय अभिनेत्रीची मॅटर्निटी फॅशनही (Maternity Fashion) खूप पसंत केली जात आहे.