Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!
Alia Bhatt नं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
Alia Bhatt Glowing Face : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिच्या मुलीला राहाला (Raha Kapoor) जन्म दिला. राहाला जन्म दिल्यानंतर आलियानं लगेचच तिच्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आलियानं तिच्या वजन कमी करण्यासाठी योगा आणि फिटनेसवर लक्ष दिले आहे. दरम्यान, आलियानं नुकताच सोशल मीडियावर तिचा नो मेकअप सेल्फी शेअर केला आहे. यावेळी प्रेग्नंसीनंतर आलिया तिच्या त्वेचेची काळजी कशी घेते याची झलक पाहायला मिळत आहे. आलियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया तिच्या घरात असल्याचे दिसत आहे. आलियाच्या चेहऱ्याच्या एकाबाजुला सूर्यप्रकाश येत असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येणारा ग्लो आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये आलियाचा मेकअप लूक दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियानं कॅप्शन दिलं की 'मॉर्निंग स्लर्प' आणि यासोबत एक स्टिकर देखील पोस्ट केले आहे. ज्यामध्ये एक मुलगी तिच्या चेहऱ्यावर मास्क लावत आहे. प्रेग्नंसीनंतर आलियाची फिगर आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्याची खूप प्रशंसा केली जात आहे. राहा कपूरला जन्म दिल्यानंतर आलिया अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे आणि प्रत्येक वेळी तिच्या लूक आणि सौंदर्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (After Pregnancy Alia Bhatt's Glowin Face)
राहाला पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागेल इतक्या वर्षांची प्रतिक्षा
'आम्हाला माहिती आहे की, हे तुमचं रोजचं काम आहे. आम्हालाही तुमची तितकीच गरज आहे, जितकी तुम्हाला आमची गरज असते. पण काहीही करा 'राहा'चा चेहरा समोर येता कामा नये. त्या जागी वडा पाव आणि भजी लावा. आमची विनंती आहे चुकूननही राहाचा चेहरा दिसता कामा नये. फ्रेममध्ये असल्यास तिला कृपया दाखवू नका. आई-वडील म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे,' असं आलियाने पापाराझींना सांगितलं.
'आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे', असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली.