Alia Bhatt got joy award in saudi arebia : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलियाला तिच्या चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सौदी अरेबियातील जॉय अवॉर्ड्स 2024 मध्ये 'मानद पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीसह, आलिया या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित होणारी सर्व क्षेत्रातील पहिली भारतीय महिला देखील आहे. 12 वर्षांच्या कारकिर्दीत, आलियानं भारतातील सर्वात तरुण, सर्वात लोकप्रिय सुपरस्टार म्हणून तिचे स्थान यशस्वीरित्या मजबूत केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुरस्कार सोहळ्याला सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर एंटरटेनमेंटचे अध्यक्ष शेख तुर्की अललशैख उपस्थित होते. या कार्यक्रमात सर अँथनी हॉपकिन्स, केविन कॉस्टनर, मार्टिन लॉरेन्स, इवा लॉन्गोरिया, जॉन सीना, जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि झॅक स्नायडर यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित नावांची उपस्थिती दिसली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


भारताची संस्कृती आणि वारसा दाखवत, आलियाने सोहळ्यासाठी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या अजराख प्रिंटची साडी घातली आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याविषयी बोलताना आलिया म्हणाली 'खरंच हा एक सुंदर क्षण आहे. मला चित्रपटांचे वेड आहे. मी याआधीही हे सांगितले आहे की मी जन्माला आल्यापासून मी लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन' पाहिले आहे. माझ्यासाठी सिनेमाचा अर्थ असा आहे की जर आपण आनंदाबद्दल बोलत आहोत तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रेम. म्हणून आज रात्री घरी परतल्यावर मी माझ्यासोबत रियाधमध्ये जे प्रेम अनुभवले ते घेऊन जाईल. तुमचे खूप खूप आभार. हीच इथल्या चित्रपटांची जादू आहे.'


याआधी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील जबरदस्त काम आणि योगदानासाठी जॉय अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग


आलियाविषयी बोलायचे झाले तर ती फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत ती एक निर्माती आणि उद्योजिका देखील आहे. आलिया सगळ्यात शेवटी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेनं सगळ्यांचे मन जिंकले होते. या चित्रपटातील तिची आणि रणवीर सिंगची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, या चित्रपटात त्यांच्याशिवाय, शबा आजमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.