मुंबई : हल्ली अनेक कलाकार आपला स्ट्रगल, डिप्रेशन यासगळ्या गोष्टींवर अगदी मोकळेपणाने बोलतात. त्यांच बिघडलेलं मानसिक संतुलन किंवा त्यांना होणारा त्रास या गोष्टी अगदी सहज सगळ्यांसमोर मांडतात, असं या वर्षात आपण पाहिलं आहे. असंच काहीस आलिया भट्टची बहिण शाहिन भट्टने केलं आहे. शाहिनने तिला होणारा त्रास एका पुस्तकाच्या रुपात मांडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आय हॅव नेवर बीन (अन) हॅपीयर' I Have Never Been (Un) Happier) या पुस्तकात शाहिनने आपल्या मनाची घालमेल लिहिली आहे. हे पुस्तक शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी संपूर्ण भट्ट कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी भट्ट कुटुंबियांनी देखील आपली मानसिक स्थिती, त्यांना होणारा नैराश्याचा त्रास, असुरक्षिततेची भावना, त्यांचा स्ट्रगल आणि दारूचे व्यसन यासगळ्या गोष्टींवर अगदी मोकळ्या गप्पा मारल्या. 


पूजा भट्टने या अगोदरही आपल्या दारूच्या व्यसनाबद्दल सांगितलं होतं. या कार्यक्रमातही तिने याबद्दल सांगितलं. पण पुढे ती म्हणाली आमच्या संपूर्ण कुटुंबाला दारूपिण्याचा 'genetic flaw'आहे जो वडिल महेश भट्ट यांच्याकडून मिळाला आहे. पण आलिया या सगळ्यापासून वेगळी असल्याचं पूजा भर कार्यक्रमात म्हणाली. 


त्याचप्रमाणे आलियाच्या प्रश्नाला उत्तर देत पूजा म्हणाली की, 'आम्ही खरं बोलतो. स्पष्ट आणि खरं बोलण्याची सवय आमच्या रक्तात आहे. जे खरं आहे तेच आम्ही बोलतो. लोकांना काय ऐकायचंय ते आम्ही बोलू शकत नाही.' आलिया बॉलिवूडमध्ये लोकप्रिय का आहे? यावर उत्तर देताना पूजा म्हणाली की,'मला वाटतं तू बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेस. याच कारण तुझ्यात आपल्या कुटुंबातील तो गुण नाही. जो माझ्यात आणि शाहीनमध्ये आहे.' हे उत्तर ऐकताच आलिया हसू लागली. 


पुढे पूजा म्हणते की,'बॉलिवूडमध्ये खरेपणा जास्त कामी येत नाही. इथे सगळा दिखावा आहे. इथे लोक नकली दुनियेत राहतात.' त्यानंतर पूजा म्हणाली की,'इथे लोकांना फरक पडत नाही की, तुम्ही कोकीन पिता की दारू. जोपर्यंत तुम्ही चांगले दिसता आणि तुमची कंबर बारिक आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. तुमच्या खासगी आयुष्यात तुम्ही कोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जाता याच्याशी त्यांचा काही संबंध नाही.'