Alia Bhatt Look A like : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर फक्त राज्य करत आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्या गाण्यांवर प्रेक्षक वेगवेगळे रील शेअर करत आहेत. त्यातील झुमका हे गाणं तर वेगळ्याच लेव्हलवर प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जी मुलगी डान्स करत आहे ती अभिनेत्री आलिया भट्टसारखी दिसणारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियासारख्या दिसणाऱ्या या मुलीनं तिचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आलियासारखी वॉट झुमका या गाण्याच्या स्टेप करतान दिसत आहे. तिचा लूक पाहिल्यावर लगेच सगळ्यांना आलिया नक्कीच आठवेल. तिच्या लूकनं सगळ्यांना वेड लावलं आहे. सुरुवातीला ती मुलगी पांढऱ्या कुर्तीमध्ये दिसते. काही क्षणातचं ती साडीत दिसते. त्यानंतर ती आलिया प्रमाणे एक्सप्रेशन देऊ लागते. ती हा सीन रिक्रिएट करताना दिसते. तर या व्हिडीओत कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या मुलीचे नाव रोशनी सोनी असं आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 185K फॉलोवर्स देखील आहेत. रोशनी ही बंगळुरुची आहे. तिचे या आधी देखील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओला 1.4 मिलियन व्ह्यूज देखील आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : सहकलाकारांनी माझी रॅगिंग केली; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा


रोशनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. एक नेटकरी म्हणाला की तू डिट्टो आलिया भट्टसारखी दिसते. दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू आलिया भट्टची कार्बन कॉपी आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'आलिया आणि तू सारख्या दिसतात.' आणखी एक नेटकरी सगळ्यांना प्रश्न विचारत म्हणाला, 'कोणा कोणाला ही आलिया वाटली.' दुसरा नेटकरी म्हणावा, 'जितके कलाकार आहेत त्या सगळ्यांची कॉपी आहेत... आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं कोणी कॉपी आहे की नाही.'  तिसरा नेटकरी म्हणाला, 'अॅमेझॉनवरची आलिया.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'जगात सगळ्याच कलाकारांच्या कॉपी पाहायला मिळत आहेत... आमचा पण कॉपी काढा कोणी तरी.' दुसरा म्हणाला, 'मला आलिया भट्टची झेरॉक्स कॉपी निघाली.'